रामटेक तीर्थक्षेत्र आराखडा, दुसऱ्या टप्प्यात २११ कोटींची मंजुरी Pudhri Photo
नागपूर

नागपूर : रामटेक तीर्थक्षेत्र आराखडा, दुसऱ्या टप्प्यात २११ कोटींची मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा

जिल्ह्यातील रामटेक प्राचीन नगरी व प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यातील आराखड्यास मान्यता दिली. यात २११ कोटी रूपयांना अर्थसंकल्पात मंजुरी दिली.

रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी रामटेक शहराचे सौंदर्यीकरण, गडमंदीर येथे आकर्षक विद्युत व्यवस्था, दुकानगाळे, अंबाळा येथे दुकानगाळे, विद्युत व्यवस्था, नारायण टेकडीचा विकास, कालिदास स्मारकाचा विकास, राखी तलाव विकास, रामटेक शहराला सुंदर बनविण्यासाठी रामटेकचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी रामटेकच्या विकासाची पूर्ण नियोजन केले.

सदर बांधकाम करतांना रामटेकचा 'हेरिटेज' व बांधकामाचा प्लॅन हा राज्य संरक्षीत स्मारकाशी सुसंगत केला असून, देशातील विविध स्थळांचा विशेषत अयोध्येच्या धर्तीवर रामटेकचा हा विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे.

रामटेकच्या विकासाच्या मूलभूत गरजांचा अभ्यास करून हे नियोजन कऱण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आशिष जयस्वाल यांच्या समवेत गडमंदीर येथे जाऊन सर्व परिसराची पाहणी केली व शब्द दिला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT