अक्षय डोंगरे Pudhari
नागपूर

Nagpur Railway Accident | फाटक ओलांडताना रेल्वेची धडक: तरुणाचा जागीच मृत्यू

Nagpur Youth Killed | रमानगर रेल्वे क्रॉसिंगजवळ घटना

पुढारी वृत्तसेवा

Ramanagar Railway Crossing Train Collision

नागपूर : रेल्वे फाटक ओलांडून घरी जात असताना भरधाव मालगाडीने दिलेल्या धडकेत एका १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना  नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील रमानगर रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली. ​अक्षय डोंगरे (वय १९, रा. रमानगर, कामठी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय काल रात्री आपल्या घराकडे जाण्यासाठी रमानगर रेल्वे क्रॉसिंग ओलांडत होता. याच वेळी नागपूरच्या दिशेने अत्यंत वेगाने जाणाऱ्या एका मालगाडीने त्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अक्षयचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

मृत अक्षयच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. ऐन उमेदीच्या काळात अक्षयचा असा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण रमानगर परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT