नागपूर - भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यामध्ये 22 ते 26 जुलैपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वादळीवारा, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. दिनांक 23, 24 व 26 जुलै रोजी येलो अर्लट तर दिनांक 25 जुलै रोजी ऑरेंज अर्लट दिलेला असुन या कालावधीमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे.
या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. विज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व विज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप खांडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर दूरध्वनी क्र. ०७१२-२५६२६६८ येथे संपर्क साधावा.