Nagpur book factory raid
नागपूर : नागपुरात बालभारतीच्या बेकायदेशीर पुस्तके छापणाऱ्या कारखान्यावर बालभारती आणि पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे.
नागपुरात मोठ्या प्रमाणात बालभारतीची बनावट पुस्तके छापली जात होती, अशी माहिती मिळाल्यावर ही धाडीची कारवाई करण्यात आली. बालभारतीकडून दरवर्षी शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके मोठ्या प्रमाणात छापली जातात. ही पुस्तके छापत असताना अधिकृत कंत्राट देण्यात येते.
मात्र, असे असताना बेकायदेशीरित्या नागपुरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या प्रतिभा प्रिंटर्समध्ये ही मोठ्या प्रमाणावर बनावट पुस्तके छापले जात होती.यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार नियमानुसार बालभारतीकडून ज्याला कंत्राट दिले. त्या ऐवजी नागपुरात हिंगणा एमआयडीसीमधील प्रतिभा प्रिंटरसकडून ही पुस्तके छापली जात असल्याची माहिती मिळाली. यात इयत्ता नववी ते बारावी वर्गाचे गणित आणि इतर विषयाचे पुस्तक छापले जात असल्याचे चौकशीत समोर आले.
आता या प्रकरणी बालभारतीचे अधिकारी आणि हिंगणा एमआयडीसी पोलिस पुढील कारवाई करणार आहेत, अशी माहिती बालभारतीचे अधिकारी राकेश पोटदुखे यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली.