Crime Against Women Pudhari
नागपूर

Assault case Nagpur: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप

फेसबुकवरून झाली ओळख; सीताबर्डी पोलिसांत तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून ३६ वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी शुभम प्रफुल जैस्वाल याच्याविरुद्ध बलात्कार, धमकी, शिवीगाळ आणि अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपी सीताबर्डी परिसरातील एका बारमध्ये वेटर म्हणून काम करत असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा विवाह २००८ मध्ये झाला होता. मात्र, २०२२ मध्ये पतीचे निधन झाल्यानंतर ती आपल्या मुलीसह आईच्या घरी राहत होती. याच काळात फेसबुकच्या माध्यमातून तिची शुभम जैस्वाल याच्याशी ओळख झाली.

तक्रारीनुसार, ओळख वाढल्यानंतर शुभमने महिलेला लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर धरमपेठ परिसरातील एका हॉटेलसह अन्य ठिकाणी तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर आरोपी टाळाटाळ करू लागल्याचा आरोप आहे. तसेच फोनवरून धमकी देणे, शिवीगाळ करणे आणि पैशांची मागणी केल्याचेही महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

या तक्रारीची दखल घेत सीताबर्डी पोलिसांनी शुभम जैस्वाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून संबंधित व्यक्तींची चौकशी तसेच उपलब्ध पुराव्यांची पडताळणी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT