BJP alliance  (File Photo)
नागपूर

Nagpur Politics | भाजपने 15 नोव्हेंबरपर्यंत महायुतीसंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, घटक पक्षांचा इशारा

Nagpur BJP | नागपूर जिल्ह्यातील महायुतीसह समविचारी पक्षांची महत्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, गणेशपेठ येथे पार पडली

पुढारी वृत्तसेवा

Nagpur BJP alliance issue

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील महायुतीसह समविचारी पक्षांची महत्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, गणेशपेठ येथे पार पडली. यावेळी आमची नेत्यांशी प्राथमिक चर्चा झाली असून येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत भाजपने महायुती संदर्भात चित्र स्पष्ट करावे, अन्यथा स्थानिक पातळीवर सर्व घटक पक्षांकडे आपले सक्षम उमेदवारांची यादी तयार आहे, असा इशारा दिला गेला.

एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत स्वबळाच्या दृष्टीने सर्वच पक्षांची पडताळणी सध्या जोरात आहे. उमेदवारांना केवळ पाच दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत. आगामी नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणनितीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीला आमदार कृपाल तुमाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर जिल्हा निरीक्षक राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश महासचिव तानाजी वणवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, अजय बोढारे, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवार, विनोद सातंगे, राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर शहर जिल्हाध्यक्ष अनिल अहिरकर, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवा अध्यक्ष अतुल खांडेकर, प्रदेश महासचिव बजरंग परिहार, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष चेतन खडसे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. महायुतीचा मोठा घटक पक्ष या नात्याने भाजपचा निर्णय लवकर न आल्यास दुसऱ्या बैठकीत पुढील धोरणात्मक दिशा ठरविली जाईल, यावर घटक पक्षांच्या नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT