जिल्हाप्रमुख सूरज गोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरव महाजन यांचा शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश  Pudhari
नागपूर

Nagpur Municipal Election | नागपूर महापालिका निवडणूक : शिंदे शिवसेनेसाठी ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराची माघार

प्रभाग क्रमांक २१-ड मध्ये शिवसेनेची राजकीय ताकद वाढली

पुढारी वृत्तसेवा

Eknath Shinde Shiv Sena Shiv Sena Thackeray

नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ठाकरे शिवसेनेच्या एका उमेदवाराने शिंदे शिवसेनेला पाठिंबा दिला. या माध्यमातून महानगरपालिकेच्या निवडणूक रणांगणात शिवसेनेला प्रभाग क्रमांक २१-ड मध्ये राजकीय बळ प्राप्त झाले आहे.

शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार अजय अनंत दलाल यांच्या समर्थनार्थ शिवसेना (उबाठा गट) उमेदवार गौरव महाजन यांनी आपला नामांकन अर्ज परत घेऊन शिवसेनेच्या विजयाचा निर्धार केला. शिवसेना उपनेते आमदार कृपाल तुमाने , शिवसेना पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव आणि शिवसेना नागपूर लोकसभा जिल्हाप्रमुख सूरज गोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरव महाजन यांचा शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश संपन्न झाला.

यावेळी शहरप्रमुख समीर शिंदे, शहर संघटक नरेश मोहाडीकर ,आशिष नाकाडे, सागर मोंदेकर, अल्पेश शिवणकर, रितेश संतोके, हरीश पाठराबे, विकास अंभोरे, राजू तुमसरे अलका दलाल, सह ईतरही शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT