Nagpur Municipal Election Pudhari
नागपूर

Nagpur Municipal Corporation | भाजपने युती धर्म निभावला; ६ भाजप, १ शिवसेना; नामनिर्देशित स्वीकृत नगरसेवकांची घोषणा

शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघांतील अनुभवी कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे

पुढारी वृत्तसेवा

NMC Nominated Corporators

​नागपूर: महानगरपालिकेतील दहा स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवारी (दि.१५) सात नावांची घोषणा शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी अधिकृतपणे केली. यामध्ये शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघांतील अनुभवी कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.

युतीच्या वचनपूर्तीसाठी शिवसेनेच्या वाट्याला एक जागा देण्यात आली आहे.​ काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांची आता नावांवर शिक्कामोर्तब करताना कसोटी लागणार आहे.

भाजपच्या वतीने देवेंद्र मेहर (पूर्व नागपूर), विनोद बघेल (पश्चिम नागपूर), संजय ठाकरे (दक्षिण नागपूर), जितू ठाकूर (उत्तर नागपूर), रितेश गावंडे (दक्षिण-पश्चिम नागपूर) आणि सुबोध आचार्य (मध्य नागपूर) यांची स्वीकृत सदस्य म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेनेसोबत युतीची चर्चा करताना त्यांना एक स्वीकृत सदस्य देण्याचे ठरले होते. या शब्दाची पूर्तता करत भाजपच्या कोट्यातून शिवसेना शहर अध्यक्ष सुरज गोजे यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्यात आली. "आम्ही युतीचा धर्म पाळला असून मित्रपक्षाला दिलेले वचन पूर्ण केले आहे," असे दयाशंकर तिवारी यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT