Nagpur MLC pudhari
नागपूर

Nagpur MLC: माघार नाही, मी कोणाचा ऐकणार नाही... कराळे मास्तरांनी उमेदवारी अर्ज भरून अपक्ष शड्डू ठोकला

'मी घराघरात पोहचलो आहे. इतर लोकांना आपली ओळख सांगावी लागेल. मात्र मी घराघरात पोहचलो असल्याने माझे नाव घराघरात माहिती आहे.' नितेश कराळे

Anirudha Sankpal

Nagpur MLC nitesh karale: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नितेश कराळे जे कराळे मास्तर या नावाने प्रसिद्ध आहेत त्यांनी बंडाचे निशान फडकवलं आहे. नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून शड्डू ठोकला आहे. त्यांनी आता माघार नाही असा तुर्तास तरी पवित्रा घेतला असून अर्ज दाखल करण्यासाठी ते ज्योतिबा फुलेंच्या वेशात आले होते.

यावाळी पत्रकारांशी संवाद साधताना कराळे म्हणाले, 'आगोदरच्या निवडणुकीत मी कोरोना असताना व्हायरल झालो होते. तेव्हा मी फक्त शैक्षणिक क्षेत्रातील एक व्यक्ती होतो. आता मी राजकारणात उतरलो आहे. त्यामुळं मी घराघरात पोहचलो आहे. इतर लोकांना आपली ओळख सांगावी लागेल. मात्र मी घराघरात पोहचलो असल्याने माझे नाव घराघरात माहिती आहे.'

कराळे मास्तर पुढे म्हणाले, 'बॅलेट पेपरवर पक्षाचे चिन्ह नाही. फक्त उमेदवाराचे नाव असते याचा मला भरपूर फायदा होणार आहे. मी महाराष्ट्रात शिव फुले आंबेडकर विचारधारा पेरत आतापर्यंत ३ हजार सभा घेतल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रिबाई फुले, बिरसा मुंडा, भगतसिंह या सर्वांना देशाच्या विकासात आणि स्वातंत्र्यात योगदान दिलं आहे. त्यामुळे मी आज फुलेंच्या वेशभूषेत आलो आहे.'

कराळेंनी या निवडणुकीतून माघार घेणार नाही असं सांगितलं आहे, अनिल देशमुख मला आतून मदत करतील. बाकीचे करतील तो न्याय आणि आम्ही केली तर बंडखोरी कशी काय असा सवाल देखील कराळे यांनी विचरला. माघार घेण्यासाठी मी कोणाचं ऐकणार नाही आणि मला कोणी फोन देखील करणार नाही असा देखील दावा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT