Nitin Gadkari Devendra Fadnavis Nagpur Meeting Pudhari
नागपूर

Nagpur Mayor Election | नागपूरचा महापौर कोण? नितीन गडकरी - देवेंद्र फडणवीस यांची खलबते

Nagpur Municipal Corporation | 6 फेब्रुवारी रोजी रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात एका विशेष सभेत महापौर,उपमहापौर निवड होणार

पुढारी वृत्तसेवा

Nitin Gadkari Devendra Fadnavis Nagpur Meeting

नागपूर : नागपूरच्या महापौर पदावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. येत्या 6 फेब्रुवारी रोजी रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात एका विशेष सभेत महापौर,उपमहापौर निवड केली जाणार आहे.

केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (दि.३०) या संदर्भात रात्री महत्त्वपूर्ण बैठक होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

शहर भाजपचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्यासह प्रमुख नेतेही बैठकीत सहभागी होणार आहेत. यावेळी महापौर व उपमहापौर पदासाठीच्या नावांवर सखोल चर्चा होणार आहे. या बैठकीत दोन्ही पदांसाठी नावे निश्चित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT