

Anjali Bharti Controversy
नागपूर: भंडारा येथील एका कार्यक्रमात गायिका अंजली भारती यांनी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. या प्रवृत्तीचा तीव्र निषेध करण्यासाठी भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजप महिला आघाडीच्या वतीने पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष दिव्याताई धुरडे यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांना भेटले. यावेळी अंजली भारती यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. "सार्वजनिक व्यासपीठावरून एका महिलेबद्दल अशा प्रकारचे असभ्य वक्तव्य करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखणे गरजेचे आहे," असे मत व्यक्त केले.
यावेळी भाजप महामंत्री श्रीकांत आगलावे, महामंत्री रितेश गावंडे, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन करारे, अश्विनी जिचकार, युवा मोर्चा युवती अध्यक्ष प्रशंसा भोयर, मनीषा अतकरे, सीमा ढोमने, मोहिनी रामटेके, मधुर भांडारकर व इतर भाजप महिला आघाडीच्या अनेक पदाधिकारी, नगरसेविका आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.