Nagpur Municipal Election Pudhari
नागपूर

Nagpur Mayor Election |नागपूर महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक शुक्रवारी: स्थायी समितीवर कुणाची वर्णी?

महापालिकेत महिला राज अनुभवास येणार आहे. दोन्ही पदे दक्षिण नागपूरला प्रथमच मिळाली आहेत

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Municipal Corporation

नागपूर : ​नागपूर महानगरपालिकेच्या 55 व्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी (दि. 6) सकाळी 11 वाजता रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात विशेष सभा बोलाविण्यात आली आहे.

यावेळी स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड होणार असल्याने यावर कुणाकुणाची वर्णी लागणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपदी शिवानी दानी यांची निवड होणार असल्याची माहिती आहे. यामुळे महापालिकेत महिला राज अनुभवास येणार आहे. दोन्ही पदे दक्षिण नागपूरला प्रथमच मिळाली आहेत.

प्रभाग २८ च्या नगरसेविका श्रीमती नीता ठाकरे आणि उपमहापौर पदासाठी प्रभाग २९ च्या नगरसेविका श्रीमती लीला हाथीबेड यांनी आपले अर्ज दाखल केले असून काँग्रेसतर्फेही महापौर, उपमहापौर पदासाठी स्नेहल ठाकरे-सूचक सरस्वती सलामे, अनुमोदक मंजू चाचेरकर, उपमहापौर उमेदवार विवेक निकोसे, सूचक -प्रमोद ठाकूर, अनुमोदक प्रगती यादव याप्रमाणे उमेदवार उभे करण्यात आले आहेत.

काँग्रेस,शिवसेना शिवसेना ठाकरे गटाच्या 36 नगरसेवकांची नागपूर महाविकास आघाडी आणि भाजपच्या 102 नगरसेवकांनी स्वतंत्रपणे गट नोंदणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT