Nagpur Politics | नागपूर महापालिकेत शिवसेना ठाकरे गट अखेर नागपूर महाविकास आघाडीत सामील

Shiv Sena UBT Nagpur MVA | जनविरोधी धोरणांविरोधात निर्णायक संघर्ष छेडण्याचा निर्धार
Nagpur Municipal Corporation alliance
Shiv Sena UBT Congress NCP alliancePudhari
Published on
Updated on

Nagpur Municipal Corporation alliance

नागपूर: नागपूर महानगरपालिकेतील बहुमतातील भाजपचा वर्षानुवर्षे सुरू असलेला मनमानी कारभार आणि जनविरोधी धोरणांविरोधात निर्णायक संघर्ष छेडण्याच्या ठाम भूमिकेतून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने मंगळवारी (दि.३) काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘नागपूर महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

निवडणूकपूर्व दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. आता काँग्रेसच्या गटाचे संख्याबळ 34 वरून 36 झाले. लवकरच ते 40 होण्याचा विश्वास व्यक्त होत आहे. या राजकीय घडामोडीमुळे महानगरपालिकेतील विरोधकांना आता बळ मिळणार आहे.

Nagpur Municipal Corporation alliance
NCP Nagpur | अजित पवारांच्या अस्थी कलशाच्या दर्शनासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; जुन्या आठवणींना उजाळा

याविषयीचा निर्णय शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या पुढाकाराने झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. बैठकीस मनपा नागपूर महाविकास आघाडी गटनेते संजय महाकाळकर, आणि शिवसेना उबाठा गटनेते किशोर कुमेरिया उपस्थित होते.

यानंतर दोन्ही गटांच्या नेत्यांनी विजयलक्ष्मी बिदरी, विभागीय आयुक्त, यांची भेट घेऊन सर्व कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्या. यानंतर फेरीवाल्यांवरील अन्यायाविरोधात काँग्रेस नगरसेवकांचे मनपा मुख्यालयासमोर आज मंगळवारी पहिले निर्णायक आंदोलन झाले. सदस्य संख्येनुसार स्वीकृत सदस्य आणि विविध समित्यांमधील वाटा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील या गटाला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news