नागपूर: पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नागपूर महानगर लोकसभा अंतर्गत महायुतीचे सर्व प्रमुख नेते व समन्वयकांची बैठक भाजपा धंतोली येथील विभागीय कार्यालयात नुकतीच पार पडली. यानिमित्ताने गेल्यावेळी परस्परांच्या विरोधात प्रचारात उभे ठाकलेले मांडीला मांडी लावून बसल्याचे बघायला मिळाले.
या बैठकीत खासदार कृपाल तुमाने, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), समन्वयक शिंदे गट शिवसेना व इतर सर्व पक्षांची चर्चा झाली.
लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर गांभीर्याने लक्ष केंद्रित करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे विदर्भाचे संघटन मंत्री
उपेंद्र कोठेकर, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार अनिल सोले, राष्ट्रवादीचे ईश्वर बाळबुधे, प्रशांत पवार, अनिल अहिरकर यांच्याशिवाय शिवसेनेकडून सूरज गोजे, दिवाकर पाटणे, विलास त्रिवेदी, मिलिंद महादेवकर, राम अंबुलकर, विनोद सातंगे, शुभम नवले, नंदा गोडघाटे, सुरेश बिहंडे, कैलास बोबले, विजय आगलावे, विनोद थुल, अश्विनी जिचकार, संदीप गवई, विष्णू चांगदे आदर्श पटले, नरेंद्र चौहान, चंदन गोस्वामी, संदीप सावरेकर, नाविन्यपूर्ण फोडणे, अनिकेत खोब्रागडे, कमल यादव, संदीप कांबळे, राजेश मते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा