crime news File Photo
नागपूर

Nagpur News: प्रेमाचा त्रिकोण ठरला जीवघेणा! नागपुरात तरुणाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

प्रेमाच्या त्रिकोणातून कुऱ्हाडीने वार करून एका युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

पुढारी वृत्तसेवा

Nagpur News

नागपूर : प्रेमाच्या त्रिकोणातून कुऱ्हाडीने वार करून एका युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. तुषार रमेश कुडमते (वय २७) असे मृताचे, तर अजय सिरसाम असे मारेकऱ्याचे नाव आहे. तुषार याचा फळभाजी विक्रीचा व्यवसाय होता.

वर्षभरापूर्वी तुषारचे सिजराइल या तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले. दोघांनी मंदिरात लग्न केले होते. तीन महिन्यांपूर्वी सिजराइलची अजयसोबत ओळख झाली. अजयने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तो तिच्या समुद्रपूर येथील घरी गेला होता. याची माहिती तुषारला मिळाल्यानंतर तो पत्नीला परत आणण्यासाठी तेथे गेला.

यावेळी अजयने तुषारला मारहाण केली होती. या प्रकरणी तुषारने पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर अजयला अटक केली होती. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कारागृहात रवानगी केली. काही दिवसांपूर्वी अजय कारागृहातून बाहेर आला.

त्यानंतर पुन्हा तुषार आणि त्याच्यात वाद झाला. शुक्रवारी सिजराइलने तुषारसोबत राहण्यास नकार देत मंगळसूत्र काढून त्याच्या हातात दिले आणि घरातून निघून गेली. यानंतर ती अजयसोबत बुटीबोरीतील हनुमाननगर येथे असल्याची माहिती तुषार मिळाली. त्याने तिथे जाऊन पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यादरम्यान झालेल्या वादात अजयने तुषारची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT