मृत टोनी ऑस्कर मोन्क्रिप, एनी जारील मोन्क्रिप Pudhari File Photo
नागपूर

लग्नाच्या वाढदिवशी कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपविलेल्या दांपत्याने मागे ठेवले इतके पैसे

Nagpur News | नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

पुढारी वृत्तसेवा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : लग्नाला पंचवीस वर्षे झाली, मात्र मूलबाळ नाही. अशातच शेफची नोकरीही गेली. आज ना उद्या दुसरी नोकरी लागेल, या विश्वासावर दिवसा मागून दिवस चालले. इकडे कर्जाचा डोंगर वाढत होता. अशातच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या ड्रेसमध्ये आनंदात बाहेर फिरणे, सोबत जेवण करीत अगदी त्याच दिवशी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत व्हॉट्सअॅपवर स्टेटस शेअर करत या जगाचा निरोप घेतला. एकाच कॉफीनमध्ये ख्रिश्चन धर्म पद्धतीने त्यांचे अंत्यविधी पार पडले. अलीकडेच जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या दांपत्याच्या आत्महत्येची ही करूण कहाणी आहे.

गेली 51 वर्षे मृतदेहासाठी कॉफिन शिवण्याच्या व्यवसायात असलेले विजय मायकेल यांनी देखील अशाप्रकारे एकाच कॉफीनमध्ये अंत्यसंस्काराची आपल्या जीवनातील ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले. कर्जबाजारीपणामुळे जेरील मॉनक्रिप आणि आणि एनी मॉनक्रिप यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस उत्साहात साजरा केल्यानंतर गळफास घेतला. तरी आपण 75 हजार रुपये सोडून जात असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केले. जे वाचताना सर्वांचेच डोळे पाणावले.

या दोघांनी 'सबकी फॅमिली अलग होती है... असा एक व्हिडिओ तयार केला. जो त्यांच्या मृत्यूनंतरही अनेक प्रश्नचिन्ह कुटुंबीयांमध्ये कायम ठेवून गेला आहे. प्रत्येकाचे कुटुंब आणि परिस्थिती वेगळी असते. आमचीही वेगळी आहे. आमच्या नंतर सगळे आनंदात रहा, आपल्या मुलांची काळजी घ्या, असे व्हिडिओत त्यांनी नमूद केले असले तरी सतत मनमिळावू हसत -खेळत राहणारे हे दाम्पत्य असा काही कटू निर्णय घेतील. याची कोणालाही चाहूल लागली नाही आणि ते एकत्रितपणे या सर्वांपासून दूर दूर निघून गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT