

नागपूर : लग्नाला 26 वर्ष झाल्यानंतरही मूलबाळ नाही, बेरोजगारी तसेच आर्थिक विवंचनेला कंटाळून एका दांपत्याने गळफास घेत लग्नाच्या वाढदिनी जीवन संपवल्याची खळबळजनक घटना नागपुरातील मार्टिन नगर परिसरात मंगळवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे त्यांनी लग्नाचा वाढदिवस असल्याने नवविवाहित दांपत्याप्रमाणे वेशभूषा देखील केली आणि आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला व्हिडिओ शेअर केला. या पती-पत्नीची नावे जारील उर्फ टोनी ऑस्कर मोन्क्रिप (वय 54) आणि एनी जारील मोन्क्रिप (वय 45) अशी आहेत.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, मूलबाळ होत नसल्याने आणि बेरोजगार असल्याने नैराश्यात येऊन आपले राहते घरी नायलॉन दोरीच्या साहाय्याने आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ बनवून स्वतःच्या व्हाट्सअपवर स्टेटस ठेवत जीवन संपवले. पोलिसांनी या घटनेमागे नेमके काय कारण असू शकते याचा शोध सुरू केला आहे. मेयो हॉस्पिटलला दोन्ही मृतदेह पाठविण्यात आले असून पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच अधिक माहीती मिळेल.