Crime News file photo
नागपूर

Nagpur News: कुटुंबीयांच्या विरोधामुळे प्रेमीयुगुलाने विष प्राशन केलं; प्रियकराचा मृत्यू, प्रेयसी गंभीर

आंतरजातीय विवाहाला दोघांच्याही कुटुंबीयांनी नकार दिल्याने प्रेमीयुगुलाने विष प्राशन केले. यामध्ये प्रियकराचा मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

नागपूर: आंतरजातीय विवाहाला दोघांच्याही कुटुंबीयांनी नकार दिल्याने प्रेमीयुगुलाने विष प्राशन केले. यामध्ये प्रियकराचा मृत्यू झाला असून प्रेयसीची तब्येत चिंताजनक आहे. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध

विशाल विलास जावडे (वय २१), असे मृत तरणाचे, तर विनीता (वय २०, नाव बदललेले), असे प्रेयसीचे नाव आहे. विशाल हा ऑटोचालक होता. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, गेल्या चार वर्षांपासून विशाल व विनीताचे प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, आंतरजातीय विवाहाला दोघांच्याही कुटुंबीयांनी नकार दिला. दोघे तणावात राहायला लागले.

कुटुंबात वाद झाला अन् दोघांनी टोकाचा निर्णय घेतला

रविवारी दोन्ही कुटुंबामध्ये यावरून वादही झाला आणि दोघांनी हा टोकाचा निर्णय घेतला. दोघांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी दुपारी दोघेही घरून निघून वानाडोंगरी परिसरातील शेतात गेले. तेथे दोघांनी विष प्राशन केले. दोघांची प्रकृती खालावली एका नागरिकाला ते बेशुद्धावस्थेत दिसताच त्याने एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.

संतप्त मित्रांचा विनिताच्या घरावर हल्ला

पोलिसांनी दोघांनाही शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास विशालचा मृत्यू झाला. यानंतर विशालचे संतप्त मित्र विनिताच्या घरावर हल्ला करण्यास धडकले, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत वेळीच समजूत घातल्याने पुढील अनर्थ टळला.

'मिस यू' स्टेटस ठेवून युवकाने जीवन संपवले

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत प्रेयसीसोबतचे छायाचित्र व 'मिस यू'चे स्टेटस ठेवून प्रियकराने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. महेश (वय २६) असे मृताचे नाव आहे. तो ऑटोचालक होता. प्राप्त माहितीनुसार, महेश याने शनिवारी रात्री इन्स्टाग्रामवर आत्महत्या करीत असल्याचा संदेश पोस्ट केला. मात्र त्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. रविवारी सकाळी तो शेतात गेला. प्रेयसीसोबतचे छायाचित्र व 'मिस यू'चा संदेश स्टेटसवर ठेवत त्याने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. प्रेमभंगातून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. भिवापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT