Nagpur Cricket Ticket Black Marketing Pudhari
नागपूर

IND vs NZ Nagpur Match | भारत - न्यूझीलंड टी 20 तिकिटांचा काळाबाजार; साडेसहाशे रुपयांचे तिकिट अडीच हजाराला, एकाला अटक

T20 match ticket black market | व्हीसीए स्टेडिअम परिसरात तिकिटांचा काळाबाजार

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Cricket Ticket Black Marketing

नागपूर : नागपुरात बुधवारी (दि.२१) होणाऱ्या भारत - न्यूझीलंड टी 20 एक दिवसीय क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार सुरू झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी व्हीसीए स्टेडिअम परिसरात तिकिटांचा काळाबाजार करत होता.

साडेसहाशे रुपयांच्या तिकिटांची अडीच हजार रुपयात विक्री करण्यात येत असून तिकीट काळाबाजार प्रकरणात नागपूर सदर पोलिसांनी एका जणाला अटक केली आहे. या प्रकरणी मोहम्मद आबीद शेख इजाज याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तिकिटासह २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती सदर पोलिसांनी दिली.

दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी वेगवेगळ्या व्यवस्था

दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी वेगवेगळ्या व्यवस्था आहेत. पार्किंग कक्ष ‘ए’ या ठिकाणी फक्त व्हिआयपी, पोलिस आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठीच वाहनांचे पर्किंग उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर कक्ष-बी येथे चार चाकी, कक्ष-सी (अन्विता फार्म) येथे दुचाकी वाहने, कक्ष डी-१ येथे एका बाजुला चार चाकी तर दुसऱ्या बाजुला दुचाकी पार्किंग, कक्ष डी-२, डी-३, डी-४, डी-५, इ-(अल्ट्राटेक) येथे चार चाकी वाहनांचे पार्किंग उपलब्ध राहील. कक्ष-जी येथे फक्त मेंबर्स पार्किंग राहणार आहे, तर कक्ष-एच येथे केवळ स्कूल बसचे पार्किंग राहील. कक्ष-आय हा राखीव पार्किंगसाठी ठेवण्यात आला आहे. जामठा टी पाईंटवरून स्टेडियम व जामठा गावाकडे कोणत्याही वाहनांना हा मार्ग वापरता येणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT