Nagpur Betel Nut Traders IT Raid
नागपूर : महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर शनिवारी (दि. राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू असतानाच सकाळपासून उपराजधानीत आयकर विभागाच्या पथकाने सुपारी व्यावसायिकांवर धाडसत्र सुरू केल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.
सडक्या सुपारीचा मोठा व्यवसाय मध्य भारतात नागपुरातून चालतो. या व्यवसायातील मोठे व्यापारी असलेले राजू अण्णा, अल्ताफ कलीवाला, गनी कलीवाला, आसिफ कलीवाला यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठान, कार्यालयावर आज एकाचवेळी आयकर विभागाच्या पथकामार्फत या धाडी घालण्यात आल्या. मुंबईतील सुपारी व्यावसायिक फारूक यांच्याशी संबंधित कनेक्शनच्या कारणावरून या धाडी पडल्याचे सूत्रांनी सांगितले.
राजू अण्णा यांचे कामठी आणि शांती नगर येथे असलेल्या निवासस्थानी तसेच गनी यांच्या गोदामांवर सशस्त्र पोलिस, श्वान पथकाने धडक देताच खळबळ माजली. कलमना, मां उमिया औद्योगिक परिसरात सुपारी व्यावसायिकांची मोठी गोदामे आहेत. आयकर चुकवेगिरीच्या निमित्ताने ही मोठी कारवाई दिवसभर सुरू असल्याची, संपत्तीविषयक आक्षेपार्ह कागदपत्रे हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.