नागपूर: शहरातील वर्धा रोडवरील शहीद गोवारी आदिवासी उड्डाणपुलाच्या सुरुवातीला रहाटे कॉलनीच्या बाजूने एक इंधनाचा रिकामा टँकर अडकल्याने बराच काळ वाहतूक कोंडी झाली. सुदैवाने अनर्थ टळला.
यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. यामुळे उड्डाणपुलावर ट्रक जाऊ नयेत यासाठी उंची-मर्यादा कठडे बसवले गेले आहेत. तरीही काही वाहने त्यातून लवकर पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असल्याने अशा घटना वारंवार घडतात. आज (दि.१२ डिसेंबर) सकाळी साडेसातच्या सुमारास चंद्रपूरकडून येणारा एक टँकर उड्डाणपुलावर चढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र उंची-मर्यादा कठड्यात तो अडकल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने टँकर रिकामा होता, अन्यथा गंभीर धोका निर्माण झाला असता.