नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूरच्या सीताबर्डी मार्केट परिसरात आज (दि.५) एका दुकानाला आग लागली. संगम पतंग नावाच्या इमारतीला आग लागल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
दिवाळीच्या खरेदीसाठी आजचा एकमेव रविवार असल्याने यावेळी सीताबर्डी मेन रोडवर तुफान गर्दी झालेली असताना या आगीच्या घटनेने मोठी धावपळ उडाली. वर्दळीच्या भागात ही आग लागल्याने गाड्यांना वाट काढताना उशीर झाला. अग्निशमन दलाकडून ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून पतंगाचा मोठा साठा असल्याने ही आग बराचवेळ धुमसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा