

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 357 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व 5 ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकासाठी सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत सुमारे 26.81 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणुक विभागाने दिली आहे.
नागपूर जिल्ह्यातील 357 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व 5 ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकासाठी आज (रविवार) सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही, नागपूर ग्रामीण, हिंगणा ग्रामपंचायतीध्ये निवडणुका होत आहेत. जिल्ह्यात सकाळी 9.30 वाजेपर्यंत सुमारे 11.55 टक्के शांततेत मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. एकंदर 1224 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान होणार आहे.
यात काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही, नागपूर ग्रामीण, हिंगणा ग्रामपंचायतीध्ये निवडणुका होणार आहेत. जिल्ह्यात काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मतमोजणी सोमवार दि. 6 नोव्हेंबर रोजी तालुका स्तरावर होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी देत पाहणी केली. ग्रामीण भागात या निवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळत आहे.
हेही वाचा :