end of life fie photo
नागपूर

Nagpur Crime: नागपूरच्या अभियंत्याने महामार्गालगत कार थांबवली अन्... ; सकाळी दृश्य पाहून स्थानिक हादरले

Nagpur engineer death: राम चौधरी रविवारी सकाळी स्वतःच्या कारने अमरावतीच्या दिशेने निघाले होते

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : नागपूरमधील एका अभियंत्याने अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी परिसरात झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना रविवारी समोर आली आहे. राम विनोद चौधरी (वय ३९, रा. ऑर्बिटल एम्पायर, जयताळा, नागपूर) असे मृत अभियंत्याचे नाव असून, ते कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, राम चौधरी रविवारी सकाळी स्वतःच्या कारने अमरावतीच्या दिशेने निघाले होते. गुरुकुंज मोझरी बायपासवरील राष्ट्रसंत पेट्रोलियमजवळ त्यांनी आपली कार थांबवली. त्यानंतर जवळील शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले.

अशी उघडकीस आली घटना

सकाळी स्थानिक नागरिकांना झाडाला लटकलेल्या अवस्थेत एक मृतदेह दिसल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाजवळ सापडलेल्या कागदपत्रांवरून मृताची ओळख पटली आणि पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना या दुर्दैवी घटनेची माहिती दिली. राम चौधरी यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT