नागपूर

नागपूर: समृद्धीवर हेडफोन घालून बस चालविणे भोवले; चालकावर गुन्हा दाखल

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : हेडफोन घालून गाडी चालविताना व्हिडीओ पाहणारा चालक जळगाव आरटीओ कार्यालयाने शोधून काढला आहे. जळगाव आरटीओ कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्यासह त्यांच्या पथकाने संबंधित खाजगी बस चालकावर कारवाई केली आहे. खासगी बस जप्त केली असून चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुणे-नागपूर अशी धावणारी ही खासगी बस जळगाव आरटीओ यांनी जप्त करीत तिचा परवाना निलंबनाचा प्रस्ताव पाठविला आहे.

संबंधित बसचालकाचा परवाना निलंबनाची कारवाई पुणे आरटीओ कार्यालयात सुरू असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली. एक खासगी बसचालक कानात हेडफोन घालून समोर स्टेअरिंगवर मोबाइल ठेवून व्हिडीओ पाहून समृद्धी महामार्गावर बस चालवित असल्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला.

स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील माध्यमांशी बोलताना जनजागृती सोबतच नक्कीच कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. हा व्हिडीओ १५ ऑक्टोबर रोजी व्हायरल झाल्यानंतर जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या बसचा शोध घेतला. ही खासगी बस पुणे-नागपूर धावणारी जळगावच्या संगीतम ट्रॅव्हलची असल्याचे स्पष्ट झाले. या बसचे परमिट निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून चालकाविरुद्ध बुलढाणा येथील आरटीओ कार्यालयाच्या वतीने मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT