नागपूर

Nagpur News : सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले, फूड इन्स्पेक्टरने जीवन संपवले

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरूण सरकारी अधिकाऱ्याने नागपुरात जीवन संपवले. ही घटना नुकतीच उघडकीस आली आहे. शुभम कांबळे (वय २५) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. तो अन्न व औषध प्रशासन विभागात निरीक्षकपदी कार्यरत होते. ते परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवाशी होते. मित्राला भेटण्यासाठी ते नागपुरात आले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. Nagpur News

पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम २५ नोव्हेंबररोजी सकाळी नागपुरात मित्राला भेटण्यासाठी आला होता. त्याने सेंट्रल एव्हेन्यू येथील हॉटेल राजहंस येथे रूम बूक केली होती. तो या हॉटेलच्या रूम नंबर ३११ मध्ये थांबला होता. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या हॉटेलच्या लँड लाइनवर शुभमसाठी फोन आल्याने हॉटेलच्या व्यवस्थापकाने रूमबॉयला शुभमच्या खोलीकडे पाठवले पण, त्याने आतून कुठलाही प्रतिसाद न दिल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. लगेच गणेशपेठ पोलिस हॉटेलमध्ये दाखल झाले व त्यांनी दरवाजा उघडल्यावर शुभमचा मृतदेह बेडवर आढळून आला. खोलीतून दुर्गंध येत होता. तातडीने मृतदेह मेयो रुग्णालयात हलविण्यात आला. Nagpur News

पोलिसांनी पाहणी केल्यावर हॉटेलच्या खोलीत त्यांनी स्वतः तयार केलेले विषारी द्रव्य आढळून आले. ते पिऊनच त्याने जीवन संपविल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. त्यांनी आयएएस किंवा आयपीएस न झाल्याची खंत सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आपल्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचेही चिठ्ठीत उल्लेख आहे. गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये तो बेपत्ता असल्याची तक्रार 25 नोव्हेंबरला कुटुंबीयांनी केली होती. त्याच्या फोनच्या सीडीआरवरून तो नागपुरातील राजहंस हॉटेलमध्ये असल्याची माहिती गंगाखेड पोलिसांना मिळाली.

गंगाखेड पोलिसांनी राजहंस हॉटेलमध्ये विचारपूस केली, तेव्हा रूमचा दरवाजा उघडत नसल्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीने रूमचा दरवाजा तोडून पाहिले असता तो मृतावस्थेत आढळून आला. तो नोकरी करत नव्हता, अविवाहित होता. तसेच मिळालेल्या कागदपत्रावरून मागील एक वर्षापासून त्याच्यावर मानसरोग तज्ञांचे उपचार सुरु असल्याचे कागदपत्रांची फाईल पोलिसांना प्रथम दर्शनी तपासात मिळून आली आहे, अशी माहिती ऋषिकेश घाडगे, पोलीस निरीक्षक, गणेशपेठ यांनी दिली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT