crime News pudhari photo
नागपूर

Nagpur crime: विशाल मेश्रामच्या साथीदारांना धमकावण्यासाठी तीन देशी कट्टे?

गुन्हे शाखेची मेकोसाबाग परिसरात कारवाई; आकाश थापा अटकेत, तिघे फरार

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : नागपुरात अवैध शस्त्रांविरोधात गुन्हे शाखेच्या युनिट-५ने मोठी कारवाई करत तीन देशी कट्टे, दोन जिवंत काडतुसे आणि दोन मोबाईल फोन असा सुमारे १ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कुख्यात आरोपी आकाश राजन थापा याला अटक करण्यात आली आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहातून कुख्यात आरोपी विशाल मेश्राम याची सुटका होत असताना त्याच्या साथीदारांना धमकावण्यासाठी ही शस्त्रे ठेवण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.

गुन्हे शाखा युनिट-५च्या पथकाला मेकोसाबाग येथील लेंडी मैदान परिसरातील मातृछाया वाचनालयाजवळ एक संशयित व्यक्ती फिरत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आकाश थापा याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता दोन मॅगझिनसह देशी कट्टे, आणखी एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. त्याच्याकडील दोन मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केले.

पोलिसांच्या चौकशीत आकाश थापाने ही शस्त्रे त्याचा परिचित योगेश सिरिया आणि अभय यांच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील खंडवा येथील कथित शस्त्रविक्रेता आकाश भाई याच्याकडून घेतल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे. या शस्त्रांचा वापर एका कुख्यात गुन्हेगाराच्या साथीदारांना धमकावण्यासाठी केला जाणार होता, असा पोलिसांना संशय आहे.

विशाल मेश्रामच्या सुटकेवेळी कटाचा संशय

नागपूर मध्यवर्ती कारागृहातून कुख्यात आरोपी विशाल मेश्राम याची सुटका होत असताना त्याच्या साथीदारांना धमकावण्याच्या उद्देशाने ही शस्त्रे ठेवण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला गुन्हेगारी वर्चस्वाच्या संघर्षाची पार्श्वभूमी आहे का, याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणात आकाश राजन थापासह योगेश सिरिया, अभय आणि खंडवा येथील कथित शस्त्रविक्रेता आकाश भाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघे अद्याप फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. जरीपटका पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेली शस्त्रे नेमकी कुठून आणण्यात आली, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT