Nagpur Crime | दिल्लीहून तरुणींना आणून संगम नगरात देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांचा छापा, अड्डाचालकाला अटकेत

बोगस ग्राहकाच्या माध्यमातून सापळा; तीन पीडितांची सुटका,
Nagpur Crime
Nagpur Crime file photo
Published on
Updated on

नागपूर : दिल्ली, नागपूरसह अन्य ठिकाणांहून तरुणींना पैशांचे आमिष दाखवून आणत संगम नगर परिसरात देहव्यापारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या कथित अड्ड्यावर यशोधरानगर पोलिसांनी छापा टाकला. बोगस ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचून केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तीन पीडित तरुणींची सुटका केली. देहव्यापारासाठी घर उपलब्ध करून दिल्याच्या आरोपावरून प्रविण शालीकराम बिलसे (यादव) (३०, रा. पवननगर, यशोधरानगर) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी कारवाईत एकूण १ लाख १८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांना संगम नगर परिसरातील एका घरात तरुणींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी आणले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. माहितीची खात्री झाल्यानंतर पंचांसह पोलिस पथकाने संबंधित घरावर छापा टाकला.

२७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.२५ ते ७.३५ वाजेदरम्यान संगम नगरातील संजीवनी क्वार्टर क्रमांक ३४/१, वनदेवी चौक, हॉटेल अल रहमानसमोरील गल्लीत ही कारवाई करण्यात आली.पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी स्वतःच्या घरात तीन तरुणींकडून देहव्यापार करून घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने तिन्ही पीडित तरुणींची सुटका केली. त्यांना पुढील प्रक्रियेसाठी संबंधित यंत्रणेकडे सोपविण्यात आले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, या तरुणींना दिल्ली, नागपूरसह अन्य ठिकाणांहून पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी आणले जात असल्याचे समोर आले आहे. या तरुणींना नेमक्या कोणत्या माध्यमातून आणले जात होते आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे छाप्यादरम्यान पोलिसांनी एकूण किंमत १ लाख १८ हजार ८०० रुपयाचा मुद्येमाला जप्त केला.

या प्रकरणी यशोधरानगर पोलिस ठाण्यात संबंधित कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आलेल्या आरोपीची चौकशी सुरू आहे. सुटका करण्यात आलेल्या तरुणींच्या पार्श्वभूमीचा तसेच त्यांना या ठिकाणी आणण्यामागील व्यक्तींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त नित्यानंद झा आणि सहायक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस चाँद शेख, पोलीस उपनिरीक्षक निलकंठ नन्नावरे, पोलीस हवालदार गणेश गुप्ता, राजेश वासनिक, रवि अहीर, पोलीस अंमलदार लक्ष्मण पडवाल, रितेश दुधे, मंगेश गिरी, गजानन गेडाम, महिला पोलीस अंमलदार वर्षा नोनारे, बबीता नन्नावरे आणि चापोअं योगेश सहभागी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news