Nagpur Palash Wasnik Murder Pudhari
नागपूर

Nagpur Crime: नागपूरमध्ये रक्तरंजित थरार! कुख्यात गुंड पलाश वासनिकची निर्घृण हत्या; चाकूने वार केल्यानंतर सिमेंटच्या कुंडीने ठेचले डोके

Nagpur Palash Wasnik Murder: नागपूरच्या मेडिकल चौकात गुरुवारी रात्री कुख्यात गुंड पलाश वासनिकची चाकूने वार करून आणि सिमेंटच्या कुंडीने हल्ला करून हत्या करण्यात आली.

Rahul Shelke

Nagpur Palash Wasnik Murder: नागपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील गजबजलेल्या मेडिकल चौक परिसरात कुख्यात गुंड पलाश वासनिकची निर्घृण हत्या करण्यात आली. गुरुवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास मेडिकल रुग्णालयाच्या गेटजवळ ही थरारक घटना घडली. हल्लेखोरांनी पलाशवर चाकूने सपासप वार केले.

एवढ्यावरच न थांबता सिमेंटच्या कुंडीने त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जोरदार हल्ला केला. या भीषण हल्ल्यात पलाशचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

या घटनेमुळे नागपूरच्या गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मृत पलाश वासनिक हा रामबाग परिसरातील जुना हिस्ट्रीशीटर म्हणून ओळखला जात होता. त्याच्याविरुद्ध यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. रात्रीच्या वेळी मेडिकल चौकात नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दोन महिन्यांपूर्वीच कारागृहातून आला होता बाहेर

विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वीच एमपीडीए कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईनंतर तो कारागृहातून बाहेर आला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर काही काळातच त्याची हत्या झाल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.

पलाशची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याच्याशी संबंधित वाद लक्षात घेता पोलिसांकडून या हत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

मेव्हणा चिंटू उर्फ आयुष धुपेवर संशय

या हत्येमागे कौटुंबिक वाद असल्याची प्राथमिक चर्चा आहे. मृत पलाश वासनिकचा मेव्हणा चिंटू उर्फ आयुष धुपे आणि त्याच्या साथीदारांवर हत्येचा संशय आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पलाश हा आपल्या बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून मेव्हण्याने ही हत्या केल्याची चर्चा आहे. याच वादातून संतापलेल्या मेव्हण्याने साथीदारांच्या मदतीने पलाशवर हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मात्र, या हत्येमागील नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. चिंटू उर्फ आयुष धुपे आणि त्याच्या साथीदारांचा या हत्येत सहभाग आहे की नाही, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

आरोपींचा शोध सुरू; हत्येमागील कारणांचा तपास

या प्रकरणात पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास सुरू आहे. हल्लेखोर कोण होते, हत्येचे नेमके कारण काय होते आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.

पलाशची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याचे जुने वाद आणि कौटुंबिक संबंध या सर्व बाबी तपासाच्या केंद्रस्थानी आहेत. संशयित आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, घटनेशी संबंधित पुरावे गोळा केले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT