नागपूर - केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचा ताफा रस्त्याने जात असताना मार्ग रोखणाऱ्या एका महिला पोलीस शिपायाशी एका दुचाकीस्वराराने गैरवर्तन केले. शिवीगाळ, मारहाण करीत तिला ओढत नेल्याची घटना घडली. इतवारी दहीबाजार परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वसामान्यांसोबतच आता पोलिसही असुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे.
सैय्यद सज्जाद मुजफ्फर अली कश्यप कॉलनी, शांतीनगर असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेट मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या गावात आणि मंत्र्यांचा ताफा जात असल्याने रस्ता रोखलेला असताना मोठ्या जमावदेखत हा प्रकार उपराजधानीत घडल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे.