Maharashtra Congress vs BJP
नागपूर: महिलांच्या अधिकारांची ही लढाई आम्ही जिंकून दाखवू, विरोधकांना विश्वासात घेणार नसेल, तर हा एकछत्री कारभार यापुढे फार काळ लोकशाहीत चालणार नाही. हे लोकसभेतील मतदानातून स्पष्ट झाले आहे, असा इशारा काँग्रेस प्रवक्त्या अॅड. अवनी बंसल यांनी मंगळवारी (दि.२१) पत्रकार परिषदेत दिला.
केवळ काँग्रेसला महिला आरक्षणाविरोधी दाखविण्याचे भाजपचे कारस्थान देशातील सुजाण महिला ओळखून आहेत. काँग्रेसनेच महिलांना 33 नव्हे तर 50 टक्के आरक्षणाची मागणी लावून धरली. यापुढे रस्त्यावर, न्यायालयात आम्ही ही लढाई लढू,
महिलांचे मुद्दे हे भाजपने आपल्या स्वार्थासाठी राजकीय युद्धभूमी म्हणून वापरायला नकोत. ही नौटंकी महिलांच्या हक्कावर नको, त्यांना त्यांचे हक्क द्या, महिला आरक्षण लागू होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, 20 सप्टेंबर 2017 रोजी सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींना पत्र दिले. राहुल गांधी यांनीही पत्र लिहिले पण अजून उत्तर नाही.काही कारवाई नाही. केवळ जमलेबाजी सुरू आहे.
निवडणूक तोंडावर असताना या मुद्द्यावर देशाला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. महिला आरक्षण आणि परिसीमन दोन एकत्रित केले. काँग्रेसला महिला विरोधी ठरवले जात आहे. मात्र सत्य पराभूत होत नहीं. आज युवकांची काँग्रेस आहे. ही अभ्यासू पिढी आहे. महिला आरक्षण हा मुद्दा राजकारणाचा नाही, महिलांच्या हक्काचा असून यावर कुणी कुठल्याही पक्षाने राजकारण करू नये.
मध्यप्रदेशात महिला आयोगाला सहा वर्षात अध्यक्ष मिळालेला नाही. एपस्टिन मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. मोदींच्या भाषणात 58 वेळ काँग्रेसचे नाव, केवळ निवडणुकीचे, खुर्चीचे राजकारण आहे. परिसीमन मुद्दा एकत्र करून जनतेत संभ्रम निर्माण केला जात आहे. काँग्रेसला दोषी ठरवले जात आहे.
इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून गोळा झालेला मोठा पैसा भाजपकडेच असल्याचा आरोप बंसल यांनी केला. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, नगरसेवक अतुल कोटेचा, अवंतिका लेकुरवाळे, कुंदा राऊत, संदेश सिंगलकर, दिनेश बानाबकोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.