Chandrashekhar Bawankule Pudhari
नागपूर

Chandrashekhar Bawankule | काँग्रेसमध्ये गटबाजी; प्रफुल्ल गुडधे यांचेच शटर बंद होईल : चंद्रशेखर बावनकुळे

शहराध्यक्षपद मिळाल्यामुळे अतिउत्साहात बालिशपणाचे वक्तव्य

पुढारी वृत्तसेवा

Chandrashekhar Bawankule on Prafull Gudadhe

नागपूर : काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांचे वक्तव्य बालिशपणाचे आहे. शहराध्यक्षपद मिळाल्यामुळे ते अतिउत्साहात आहे. नागपूर शहर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी असल्याचे सर्वांनाच माहिती असल्यामुळे त्यांच्या गटातीलच लोक त्यांचे राजकीय शटर बंद करतील, अशी टीका महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (दि.९) विमानतळावर माध्यमांशी बोलताना केली.

भाजपच्या नगरसेवकांच्या प्रशिक्षण दौऱ्याबाबत बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, नागपूर शहर व जिल्ह्यातील सर्व नगरसेवक स्वतःच्या खर्चाने प्रशिक्षणासाठी जात आहेत. काही जण पर्यटनासाठीही जात असले तरी त्यांनी पक्षाकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता स्वखर्चाने जाण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाजपमधील आदर्श परंपरा आहे. माजी खासदार नवनीत राणा कष्टाळू व निष्ठावान कार्यकर्त्या आहेत. त्यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची असल्याचे बावनकुळे म्हणाले.

आताही काही काळ प्रतीक्षा करावी लागेल

सबसिडीतील सवलतींबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, काही वेळा सवलती कमी झाल्याचे दिसते; मात्र परिस्थिती स्थिर झाल्यानंतर त्या पूर्ववत होतात. कोरोनाच्या काळातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि नंतर ती सामान्य झाली होती. आताही काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व ऐतिहासिक असून भविष्यात त्यांच्यासारखा दीर्घ आणि प्रभावी कार्यकाळ पूर्ण करणे कोणत्याही नेत्यासाठी कठीण ठरेल, असे सांगितले. महायुतीतील अर्थखात्याच्या वाटपाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि महायुतीचे वरिष्ठ नेते एकत्र बसून योग्य निर्णय घेतील. कोणत्याही घटक पक्षावर अन्याय होणार नाही.

महसुली नाल्यांच्या अतिक्रमणाबाबत राज्यभर विशेष मोहीम

महसुली नाल्यांच्या अतिक्रमणाबाबत बोलताना बावनकुळे यांनी राज्यभर विशेष मोहीम राबविण्याची घोषणा केली. राज्यातील महसुली नाले, पांदण रस्ते आणि शेतकऱ्यांच्या वाहतुकीचे मार्ग पूर्ववत करणे हे महसूल विभागाचे मूलभूत कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. महसुली नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण केल्यास पाण्याचा निचरा सुरळीत होईल, पूरस्थिती टळेल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT