Nagpur Class 11 Admission 2025
नागपूर : इयत्ता 11 वी प्रवेशासाठी नागपूर विभागांतर्गत 67 हजार विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत स्थान मिळाले आहे. यातील सर्वाधिक 38,191 विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे आहेत. शिक्षण संचालनालयाच्या वतीने 28 जून रोजी विद्यार्थ्यांची गुणवत्ता प्रवेश यादी जाहीर करण्यात आली. या यादीत यांची नावे आहेत. त्या विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपले प्रवेश निश्चित करावयाचे आहेत.
30 जून ते सात जुलैपर्यंत कालावधी देण्यात आला आहे. नऊ जुलै रोजी दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागांची यादी प्रसिद्ध केली जाईल. यंदा अकराव्या वर्गाचे प्रवेश संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहेत. पूर्वी ते महापालिका क्षेत्रातच केले जात होते. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये अकरावीसाठी एकूण दोन लाख 18 हजार पाच जागा उपलब्ध आहेत.
यापैकी 67 हजार जागांकरता विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी निवड जाहीर झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 38,191 विद्यार्थी विज्ञान शाखेचे, 7400 विद्यार्थी वाणिज्य शाखेचे 21146 विद्यार्थी कला शाखेचे आहेत. नागपूर विभागाचा विचार करता भंडारा 7986, चंद्रपूर 12765, गडचिरोली 4731, गोंदिया 7857 नागपूर 25 576 आणि वर्धा 8092 अशी पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय संख्या आहे.