Nagpur Teak Wood Fire  Pudhari
नागपूर

Nagpur Fire | नागपूर चिखली लेआऊटमध्ये भीषण आग: कोट्यवधीचे सागवान लाकूड जळून खाक

सागवान लाकूड, दोन वूड कटिंग मशीन, एसी, इलेक्ट्रिक वायरिंग, टिनाचे शेड जळून खाक

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Teak Wood Fire

नागपूर : चिखली लेआऊट कळमना येथे लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणावर लाकूड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मध्यरात्री दीडच्या सुमारास लागलेल्या या भीषण आगीत मोठ्या प्रमाणावर लाकूड जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. प्लॉट नंबर 626, चिखली लेआऊट कळमना येथे ही घटना घडली.

या भीषण आगीत सागवान लाकूड, दोन वूड कटिंग मशीन, एसी, इलेक्ट्रिक वायरिंग, टिनाचे शेड असे सुमारे सव्वा ते दीड कोटींचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या जवानांनी दिली.

दीड ते दोन रामेश्वर टिंबर ट्रेडर्स हे पुरुषोत्तम रामजी पटेल यांच्या मालकीचे तर मे कमला टिम्बर ट्रेडर्स हे शंकरलाल जीवराज पटेल यांच्या मालकीचे आहे. घटनेची माहिती मिळताच कलमना, सिव्हिल लाईन्स, सुगत नगर, सकरदारा, वाठोडा,लकडगंज आणि कॉटन मार्केट अशा विविध ठिकाणच्या अग्निशमन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT