Nagpur CGO Complex Bomb Threat
नागपूर: सेमिनरी हील परिसरात केंद्रीय शासकीय कार्यालये असलेल्या सीजीओ कॉम्प्लेक्स उडवून देण्याच्या धमकीनंतर आज (दि.६) काही वेळ तारांबळ उडाली. सदर, गिट्टीखदान पोलिस व बॉम्ब शोधक, नाशक पथकानेही तातडीने घटनास्थळी धाव घेत या इमारतीचा पाचवा माळा आणि इतर इमारत परिसर शोधाशोध करीत पालथा घातला. मात्र ही धमकी अफवाच निघाली.
आज सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये पाचव्या माळ्यावर असलेल्या स्फोटक व नियंत्रण विभागाला एका मेल द्वारे हे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर विविध केंद्रीय कार्यालये एकच इमारतीत असल्याने परिसर रिकामा करण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी कसून तपासणी केली. मात्र, ती पोकळ धमकी, अफवा असल्याचे सिद्ध झाले.