

Nagpur-Mumbai now in 8 hours instead of 16 hours
ठाणे : पुढारी वृत्तसेवा
अखेर प्रवाशांची प्रतीक्षा संपली असून, गुरुवार, दि. 5 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी-आमणे या 76 कि.मी. मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. आता फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या 701 कि.मी. वाहतूक सेवेला गती मिळाली.
समुद्धी महामार्गाला वाढवण बंदर लवकरच जोडले जाईल अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी समद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याच्या उद्धटन प्रसंगी केली. समुद्धी महामार्गा हा जेएनपीए बंदराला जोडण्याचा मार्ग तयार झाला असून ते लवकरच पुर्णत्वाला जाणार आहे. हा मार्ग शहापूर- बदलापूर ते पनवेल -जेएनपीए असा असणार आहे. तर दुसरा जोडरस्ता शहापूर ते वाढवण असा तयार केला जाणार आहे. राज्यातील दोन मोठ्या बंदराना हा महामार्ग जोडला जाणार असून या मुळे मालवाहतूकीला वेग येणार आहे.
हा महामार्ग केवळ महामार्ग नाही तर इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. या महामार्गाचे नामकरण हे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब महामार्ग असे दिले गेले आहे. हा महामार्ग जेएनपीटी बंदराशी जोडला गेला असून, भविष्यात तो वाढवण बंदराला जोडला जाणार आहे. महाराष्ट्राचा हा विकासाचा महामार्ग असून, तीन टप्प्यात या महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
701 कि.मी. जलदगती महामार्ग
55,335 कोटी रुपयांचा खर्च
10 जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग
2.6 लाख कि.मी. प्रवासाचे जाळे
3 आंतरराष्ट्रीय, 7 डोमेस्टिक विमानतळ
2 मोठी, 48 लहान पोर्ट (बंदरे)
6000 कि.मी. रेल्वे नेटवर्कशी जोडणारा
120 कि.मी. प्रतितास वेगाने प्रवास शक्य
11 लाख 50 हजार वृक्षांची लागवड
76 कि.मी. मार्गावरील बोगद्यांची वैशिष्ट्ये
08 मिनिटांत गाठता येणारइगतपुरी ते कसारा अंतर
76 किलोमीटरच्या या टप्प्यात एकूण 5 बोगदे आहेत
08 किलोमीटरचा सर्वात बोगदा इगतपुरीपासून सुरू होतो
17.5 मीटर रुंदी व 9 मीटर उंचीच्या बोगद्यात तीन लेन
100 किलोमीटर तासी वेगाने येथून प्रवास करता येणार
300 मीटर अंतरावर एक असे एकूण 26 क्रॉस पॅसेज
90 मीटरच्या अंतरावर अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आली
60 अंशापेक्षा जास्त तापमान झाल्यास ऑटोमॅटिक स्प्रिंकल सुरू
24 मीटरचा एक झोन असून असे एका टनेलमध्ये 286 झोन
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ठाणे खाडीवर बांधण्यात आलेल्या तिसर्या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. हा पूल काही आठवड्यांपूर्वीच पूर्ण झाला होता, मात्र उद्घाटनाची प्रतीक्षा सुरू होती. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन झाले असून, याच कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री इगतपुरी येथून ऑनलाईन पद्धतीने ठाणे खाडी पूल-3 चेही उद्घाटन करण्यात आले. सायन-पनवेल महामार्ग हा मुंबई, नवी मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास करणार्यांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. गेल्या काही वर्षांत या महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ठाणे खाडीवर दोन अतिरिक्त पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबईहून पनवेलकडे जाणार्या दिशेचा पूल पूर्वीच सुरू करण्यात आला आहे. आता पनवेलहून मुंबईकडे येणार्या दिशेचा पूल सुरू करण्यात आला आहे.