नागपूर - नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या एका बंदिवानाने उपचारासाठी दाखल असताना मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पलायन केल्याची घटना घडली. ही घटना आज रविवारी पहाटे दोन अडीचच्याच्या सुमारास घडली. या आरोपीचे नाव हर्ष महेंद्र रामटेके वय 23 वर्ष रा भंडारा असून तो घरफोडी प्रकरणीचा आरोपी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मेडिकल हॉस्पिटल वार्ड क्रमांक 36 येथून मध्यरात्रीच्या वेळी कुणालाही शंका न येता वॉर्डातून बाहेर पडत, सुरक्षा रक्षक समोर असताना बाहेरचे दार उघडून सहज त्याने पोबारा केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल होताच कारागृह,मेडिकल रुग्णालय आणि पोलिस यंत्रणेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.