सबजेलमधून पळालेला कैदी दोन तासांत जेरबंद

Published on
Updated on

मंगळवेढा : पुढारी वृत्तसेवा

येथील सबजेलमधून शुक्रवारी सायंकाळी अंधाराचा गैरफायदा घेत एका कैद्याने पलायन केले होते. पोलिसांनी त्याचा दोन तासांत शोध घेऊन पुन्हा जेरबंद केले. आनंदा तुकाराम होनमुखे (वय 35, रा. मारोळी) असे त्या कैद्याचे नाव आहे. त्याने दीड महिन्यापूर्वी अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या मदतीने भीमा ढाणे याचा खून केला होता. या प्रकरणात तो न्यायालयीन कोठडीत होता. 

शहरातील किल्ल्यात असणार्‍या सबजेलमध्ये मंगळवेढ्यातील कैद्यांना ठेवले जाते. शुक्रवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर जेलमधील वीज गेली. त्यामुळे सर्व कैद्यांना लॉकअपमधून बाहेर काढून व्हरांड्यात ठेवण्यात आले होते.त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन जेलच्या पाठीमागे असलेल्या संरक्षण भिंतीवर चढण्याचा प्रयत्न आनंदाने केला. मात्र, उंच भिंतीवर तारेचेे कुंपण  होते. त्यावेळी आरोपीने भिंतीवरील लोखंडी अँगलला खालून रबरी पाण्याचा पाईप अडकवला व भिंतीवर चढून त्याने जेलबाहेर उडी टाकून पलायन केले.  पाऊस कमी झाल्यानंतर आरोपी पूर्ववत जेलमध्ये पाठवताना संबंधित पोलिस कर्मचार्‍यांनी आरोपी मोजले असता एक आरोपी कमी आढळून आला. त्यावेळी त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांना दिली. पो.नि. गुंजवटे यांनी सहा पोलिस पथके तैनात करून तालुक्याच्या विविध भागांत पाठविली. या पथकाने मंगळवेढा शहरासह आजूबाजूस संबंधित आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

यादरम्यान त्यांना शहरातील खोमनाळ रोड येथील ताड कॉलेजसमोर रात्री दहा वाजता संबंधित कैदी चालत चालल्याचे दिसून आले. यादरम्यान पोलिसांच्या पथकाने त्याच्यावर झडप घालून पकडले.  त्याला पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले. 

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news