Solar Plant in Butibori MIDC Pudhari
नागपूर

Nagpur Tank Explosion | बुटीबोरी MIDC येथे महाकाय पाण्याच्या टाकीचा हायड्रो टेस्टिंगदरम्यान स्फोट; सुरक्षा ऑडिटवर प्रश्नचिन्ह

अवाडा सोलर कंपनीतील ६ कामगारांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

Solar Plant in Butibori MIDC

नागपूर: नागपूर - चंद्रपूर रोडवरील विस्तारित बुटीबोरी एमआयडीसीतील अवाडा सोलर कंपनीत शुक्रवारी (दि.१९) सकाळी टेस्टिंग सुरू असताना पाण्याची टाकी फुटल्याने सहा कामगारांचा मृत्यू झाला. तर अनेक कामगार जखमी झाले आहेत. दीड लाख लिटर क्षमतेच्या महाकाय पाण्याच्या टाकीचा हायड्रो टेस्टिंगदरम्यान झालेला स्फोट इतका भीषण होता की, यात तीन मजुरांचा जागीच चुराडा झाला. गंभीर जखमी तिघांचा नंतर मृत्यू झाला.

मृतकांमध्ये सुधांशु कुमार नागेश्वर साहणी, (वय 36, मुझप्परपूर बिहार), बुलेटकुमार इंद्रजीत शहा (वय 30, रा. मिश्रोली, सुहानी पश्चिम चंपारण बिहार), शमीम अन्सारी (वय 42, रा. मुझप्परपूर, बिहार), प्रकाश बिल्ला सहानी (ग्राम गवसरा मुझाप्परपूर बिहार), अन्वर अन्सारी, मुक्तार अन्सारी यांचा समावेश आहे. हे सर्व कामगार बिहारमधील गरीब कुटुंबातील असून हजारो मैल दूर नागपुरात ते केवळ आपल्या कुटुंबासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी आले होते.

इतर जखमीची नावे बाबूचंद प्रसाद, जाकीर हुसैन, इब्राहिम अन्सारी आणि नागपूरची मयुरी तुरक अशी आहेत. अवाडा कंपनीत झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांना उपचाराकरिता बुटीबोरी येथील माया हॉस्पिटल येथे आणल्याचे कळताच जखमी कामगारांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती. जखमीनी नातेवाईक बघून जोरजोरात टाहो फोडत अश्रूना वाट मोकळी करून दिली.

प्राप्त माहितीनुसार ​आज सकाळी 11.30 ते 12 च्या सुमारास कंपनीत नवनिर्मित मेटॅलिक वॉटर टँकची चाचणी (हायड्रो टेस्टिंग) सुरू होती. दीड लाख लिटर पाण्याचा दाब पेलण्याची क्षमता तपासली जात असताना अचानक एक कानठळ्या बसवणारा आवाज झाला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. पाण्याच्या प्रचंड दाबाने टाकीचा स्फोट झाला आणि जवळपास काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पाणीच पाणी टिनाच्या पत्र्यांचा मलबा झाल्याने यात ३ कामगारांचा जागीच करूण अंत झाला.

३ जण मृत्यूशी झुंज देत होते. अन्य ४ कामगार जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.​ अवाडा कंपनीत याआधीही दि ४ नोव्हेंबरला कैलास खुशबराव कैकाडी (वय ३७) या कामगाराचा फोर्कलिफ्टखाली चिरडून मृत्यू झाला होता. त्यामुळे ​सुरक्षा ऑडिटवर प्रश्नचिन्ह कायम आहे. आज इतक्या मोठ्या क्षमतेच्या टाकीचे टेस्टिंग करताना सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले होते का?​ वारंवार अपघात होऊनही प्रशासन कुंभकर्णी झोपेतच आहे का ? आदी प्रश्न अनुत्तारितच आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT