Liquor Dispute Murder Brother killed Nagpur
नागपूर: बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खापरी पुनर्वसन भागात मोठ्या भावाने आपल्या लहान भावाचा गळ्यावर चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. मृताचे नाव वैभव शेषराव जुमडे (वय ३७) आहे. तर आरोपी भावाचे नाव हरीश शेखराव जुमडे (वय ४०) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभवला दारू पिण्याची सवय होती. दारूच्या नशेत तो अनेकदा घरातील सदस्यांना त्रास द्यायचा. शनिवारी दुपारीही वैभव दारू पिऊन घरी आला आणि नेहमीप्रमाणे शिवीगाळ सुरू केली. यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात हरीशने चाकूने वैभवच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात वैभवचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर हरीशने स्वतः बेलतरोडी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.