Nagpur IPS Daughter Death Pudhari
नागपूर

Nagpur AIIMS: नागपूरच्या एम्समध्ये शिकणाऱ्या IPS अधिकाऱ्याच्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल

एम्सच्या परिसरासह व्यवस्थापनामध्ये खळबळ| गेले काही दिवस तणावात असल्याची प्राथमिक माहिती

पुढारी वृत्तसेवा

IPS Krishnakant Pandey Daughter Death Case

नागपूर : एम्समध्ये त्वचारोगतज्ज्ञ विभागात प्रथम वर्षात शिकणाऱ्या डॉक्टर विद्यार्थिनीने खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील सीआरपीएफचे पोलीस महासंचालक डीजी आयपीएस कृष्णकांत पांडे यांची समृद्धी ही मुलगी असून या घटनेने एम्स रुग्णालय व्यवस्थापन आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून समृद्धी तणावात असल्याची माहिती पुढे आली आहे. शिव कैलास येथील मंजिरा अपार्टमेंटमध्ये समृद्धी आणि तिची मैत्रिण राहत होती. मंगळवारी रात्री सातच्या सुमारास समृद्धीची मैत्रीण रूमवर आली असता फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता. मागील बाजूने जाऊन बघितले असता 25 वर्षीय समृद्धी सीलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

लागलीच एम्स व्यवस्थापन, सोनेगाव पोलिस व नंतर कुटुंबियांना माहिती देण्यात आली. अतिशय विनम्र, हुशार असलेल्या समृद्धीने टोकाचे पाऊल का उचलले याविषयी गूढ कायम आहे. सोनेगाव पोलिसांनी तिच्या मैत्रिणींचीही चौकशी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT