अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षांनी मारहाण झालेल्या शेख याच्या कुटुंबाची भेट घेतली Pudhari Photo
नागपूर

Nagpur Politics | भाजपच्या प्रचारावरून मारहाण, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षांनी घेतली दखल

काँग्रेसचे माजी नगरसेवकाकडून मारहाण झाल्याचा आरोप, वातावरण तापले

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - कळमेश्वर नगरपालिका निवडणुकीत भाजपचा प्रचार करण्यावरून राडा झाला. एकाचे अपहरण करत बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. केदार समर्थक नागपुरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांनी ही मारहाण केल्याचे आरोप झाल्याने राजकीय वातावरण तापले.

राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या संदर्भात आसिफ खान यांच्या कुटुंबीयांची भेट घेत तातडीने ठोस कारवाईचे आश्वासन दिले. जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याशी चर्चा करीत सुरक्षेची मागणी केली.

तू काँग्रेससाठी काम का करत नाही आणि भाजपला का पाठिंबा देत आहे, असा सवाल करीत आरिफ लतिफ शेख (४१, कळमेश्वर) यांना ही मारहाण करण्यात आली. जखमीकडून नागपुरातील कॉंग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशीने मारहाण केल्याचा आरोप केला गेला असून या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटकही केली.

आरिफला कळमेश्वर भागात मारहाण करीत कारमध्ये बसविले आणि नागपूरच्या दिशेने नेत मारहाण करून सोडून दिले. दुसरीकडे काटोल येथील भाजयुमो तालुकाध्यक्ष,सरपंच गांजा तस्करीत पकडला गेल्याने माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस स्टेशन गाठत कठोर कारवाईची मागणी केली. आता नप निवडणुकीच्या तोंडावर या घटनांचे जिल्ह्यात दोन्ही बाजूने राजकारण जोरात दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT