Nagpur Bhonsla Palace  Pudhari photo
नागपूर

Nagpur Bhonsla Palace | सिनियर भोंसला पॅलेस येथे पारंपरिक शस्त्र, अश्व व वाहन पूजन

Bhonsla Palace weapon worship- | सिनियर भोंसला पॅलेस येथे पारंपरिक शस्त्र, अश्व व वाहन पूजन

पुढारी वृत्तसेवा

नागपूर- श्रीमंत राजे भोसले घराण्याच्या ऐतिहासिक व पराक्रमी परंपरेचे जतन करत, महाल येथील राजे मुधोजी भोसले यांच्या ऐतिहासिक सिनियर भोंसला पॅलेस येथे राजघराण्याच्या परंपरेनुसार विधीवत शस्त्रपूजन, अश्वपूजन आणि वाहनपूजन संपन्न झाले.

भोसले घराण्याचे सर्व वाहने, ऐतिहासिक तलवारी, ढाल, भाले, बंदुका व विविध पारंपरिक शस्त्रास्त्रांची वैदिक मंत्रोच्चारात पूजा करण्यात आली.

सैनिकी व शौर्याची परंपरा जपत घराण्यातील मानाच्या अश्वांचे पूजन करून त्यांना नैवेद्य अर्पण करण्यात आला. श्रीमंत छत्रपती राजे शिवाजी महाराज भोसले आणि श्रीमंत राजे रघूजी महाराज भोसले यांच्या समृद्ध शौर्य परंपरेचे स्मरण करून देणारा हा उत्सव आहे. नवमी आणि विजयादशमी हे केवळ सण नसून आपल्या स्वाभिमान, सामर्थ्य आणि समृद्ध संस्कृतीचे प्रतीक आहेत.

ही गौरवशाली परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य असल्याचे राजे मुधोजी भोसले यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT