4 Tiger Deaths In 12 Days Maharashtra
नागपूर : नव्या वर्षात जानेवारी महिन्यात एकीकडे टायगर सफारीसाठी लोक मोठ्या प्रमाणात विदर्भातील जंगलात गेले असताना पहिल्या बारा दिवसांत चार वाघ मृत्युमुखी पडल्याने यासंदर्भातील बातम्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गांभीर्याने दखल घेतली आहे. स्वतः जनहित याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
चार वाघ मृत्यूमुखी पडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. उच्च न्यायालयाने जनहित याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले असून न्यायालयाने याप्रकरणी अॅड. चैतन्य ध्रुव यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील सुनावणी 18 मार्च रोजी होणार आहे.
राज्यात मानव वन्यजीव संघर्ष गंभीर झाला आहे. वाघाच्या हल्ल्यात मानवी मृत्यूची संख्या वाढत असतानाच वाघांच्या मृत्यूची संख्या ही चिंताजनक आहे. 2025 मध्ये वाघांच्या मृत्यूत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर होता. या घटनांचा विचार करता 31 डिसेंबर 2025 रोजी वर्धा जिल्ह्यातील सेलू मुरबाड येथे वाघिणीच्या मृत्यूची घटना उघडकीस आली.
एका वाघाचा शेतात जिवंत विद्युत कुंपणाला लागून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह पुलाखाली पाणवठ्यात टाकण्यात आला. या घटनेनंतर अद्याप कुणालाही अटक झाली नाही. यानंतर 7 जानेवारीला पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत देवलापार परिसरात वाघाच्या आठ ते नऊ महिन्यांच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला.