Auto Drivers file photo
नागपूर

Auto Drivers Protest | ऑटो चालकांचे 23 मार्चरोजी राज्यव्यापी आंदोलन; 'आरटीओ'ला घालणार घेराव

ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे महासचिव विलास भालेकर यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

Auto Rickshaw union strike

नागपूर: प्रादेशिक परिवहन विभागाकडूनऑटो रिक्षा चालकांना कल्याणकारी मंडळात नोंदणी करण्याची सक्ती करण्यात येत असून नोंदणी न करणाऱ्या ऑटो चालकांचे परमिट नूतनीकरण, पासिंग आदी कामे रोखून धरल्या जात आहेत. या बेकायदेशीर कृत्याचे विरोधात 23 मार्च रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे महासचिव विलास भालेकर यांनी दिली.

राज्य शासनाने ऑटो रिक्षा चालकांसाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी महाराष्ट्र आणि मीटड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन केले, मात्र मंडळाच्या माध्यमातून ऑटो चालकांना मिळणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिलेली नाही. त्यामुळे ऑटो चालक संभ्रमात असून कल्याणकारी मंडळाचे सभासद होण्यास कोणीही तयार नाही. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाकडून ऑटो चालकांवर सभासद होण्यासाठी सक्ती केली जात आहे.

बेकायदेशीरपणे चालविलेल्या प्रकाराविरुद्ध रविवारी राज्य पातळीवर बैठक घेऊन सरकारचा आणि आरटीओच्या बेकायदेशीर कृत्याचा निषेध करण्यात आला. 23 मार्च रोजी राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांचा घेराव करून निवेदन देण्यात येणार आहे.

मंडळाचे सभासद होण्यासाठी पाचशे रुपये तर वार्षिक शुल्क तीनशे रुपये घेण्यात येत असून हा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा. सभासद होण्यासाठी ऑटो चालकावर बळजबरी थांबावावी. इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा आणि ई-रिक्षा नोंदणीवर त्वरित स्थगिती हवी अशा मागण्यांचे निवेदन प्रादेशिक परिवहन विभागाला देण्यात येणार आहे. यासंदर्भात शशांक राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राज्यातील ऑटो चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT