Kamthi youths detained ATS investigation
नागपूर: थेट पाकिस्तानशी संबंध असल्याच्या कारणावरून नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून दोन तरुणांना आज (दि.१३) एटीएसने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. हे दोन तरुण गेल्या अनेक वर्षांपासून कामठी येथे वास्तव्यास असून त्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट पाकिस्तानशी पाकिस्तानात काही व्यक्तींशी संबंध असल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मात्र, ही नेमकी लिंक, संवाद झालेत का काय संबंध आहेत त्याचा मागोवा आता नागपूर एटीएस घेत आहे. दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या या कारवाईनंतर पुन्हा एकदा गुप्तचर यंत्रणा कामाला लागली आहे. मध्यंतरी ऑपरेशन सिंदूर दरम्यान नागपुरातील कपिलनगर परिसरातील एक महिला मुलाला एकटे सोडून थेट सीमावर्ती भाग ओलांडून पाकिस्तानात गेली होती.
सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचेही थेट पाकिस्तानात संबंध होते. रेंजर्सनी ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली व नंतर सुटका झाली. आज एटीएस पथकाच्या कारवाईनंतर पुन्हा एकदा या घडामोडींना उजाळा मिळाला आहे.