nagpur angry grandmother threw hot water on her grandson trying to apply color video viral
नागपूर : पुढारी ऑनलाईन
नागपुरमधील कोराडी परिसरात रंगपंचमीच्या रंगाचा भंग झाल्याची घटना समेर आली आहे. रंग लावल्याने नाराज झालेल्या आजीने चक्क आपल्या चार वर्षाच्या नातावावर उकळलेले बादलीभर पाणी फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे नातू गंभीर जखमी झाला आहे. या मुलाला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, नागपुरच्या कोराडी परिसरात चार वर्षाच्या नातवाच्या अंगावर गरम पाणी टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या मुलाच्या आजीनेच नातवावर उकळलेले पाणी फेकल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नातू हा आजीला रंगपंचमी खेळताना रंग लावण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी रागावलेल्या आजीने हे भयानक पाउल उचलले. गरम पाणी अंगावर टाकल्याने छोटा नातू गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या घटनेत जखमी झालेल्या मुलाचे नाव ओम हरीश वांगे आहे. तो खापरखेडा सावनेर येथे राहतो. ओमचे वडिल वेकोलीत नोकरी करतात. ओम काही दिवसांपूर्वीच कोराडी येथे आपल्या आजीच्या घरी आला आहे.
घटनेच्या दिवशी सर्व मुले गाणी लावून रंगपंचमी खेळत होते. ओमनेही आपल्या मित्रांसह पाण्याची पिचकारी घेवून रंगपंचमी खेळायला सुरूवात केली. घराच्या अंगणात होळी पेटविण्यात आली होती. या होळीच्या आगीतच पाणी गरम करण्यात आले होते. यावेळी त्याची आजी सिंधू ठाकरे पाणी घेण्यासाठी तिथे आली.
यावेळी नातवाने रंग टाकल्याने गोंधळलेल्या आजीने स्वत:च्या नातवावर उकळलेल्या पाण्याची बारडी फेकली. उकळलेले पाणी अंगावर पडल्याने मुलगा गंभीर जखमी होउन जोर-जोरात ओरडू लागला. यानंतर कुटुंबियांनी त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.