चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अटक Pudhari Photo
नागपूर

नागपूर : चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अटक

करण शिंदे

नागपूर : घरासमोर बहिणीसोबत खेळणाऱ्या आठ वर्षीय मुलीवर तिच्या बहिणीला 20 रुपयांचे आमिष देत बलात्कार केल्याची घटना मागील आठवड्यामध्ये घडली होती. अखेर ५६ वर्षीय नराधमाला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पारडी पोलिसांनी अटक केली. गणपत जयपूरकर (रा. जय दुर्गानगर भवानी मंदिर मागे, पारडी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि.15) घडली होती.

महिला आयोग सदस्य आभा पांडे यांच्या पाठोपाठ उबाठा गटाच्या नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची व पारडी पोलीस स्टेशन गाठत ठाणेदार शिरसाठ यांची भेट घेतली. मुलीला उच्च शिक्षणापर्यंत दत्तक घेण्याची घोषणा केली. पारडी परिसरात वास्तव्याला असलेल्या मजूर दाम्पत्याला दोन मुली आहेत. रविवारी दोन्ही मुली खेळत असताना आरोपी गणपत आला. त्याने घरी पूजा असून पुजारी शोधत असल्याचे सांगितले.

घरात कोण आहे, असे विचारताच मुलींनी कुणीच नाही सांगितले. हीच संधी साधून गणपतने २० रुपये आठ वर्षाच्या चिमुकलीला दिले. तिला वडिलाचा मित्र असल्याचे सांगितले. मुलीला घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तो पळून गेला. सायंकाळी मुलीची आई आल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. आरोपीला ताबडतोब अटक करण्याची मागणी केली. मुलीला मनोधैर्य योजनेचा लाभ मिळवून देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT