नागपूर : देशाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून सातत्याने आंदोलनाचा सामना केला. मतभेद आणि मनभेद निर्माण करणे, असंतोष भडकावणे हाच आताच्या आंदोलनांचा उद्देश आहे. पण आजवर आंदोलनांमुळे कधीही सत्ताबदल झालेला नाही. आताही तसे काहीही होणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंगळवारी (दि. २०) देशात सुरू असलेल्या आंदोलनांवर भाष्य केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचा समारोप आणि विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन सोहळा नागपूरच्या रेशीमबाग येथे पार पडला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. भागवत बोलत होते.मतभेद - मनभेद करून असंतोष भडकवणे ही आंदोलनामागील कार्यपद्धती आहे. हे पूर्वापार चालले आणि आताही सुरू आहे. परकीय शक्ती याचाच गैरफायदा घेत देशात आणि अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. इंग्रजांनी तेच केले. आताही तेच सुरू आहे, अशा शब्दांन डॉ. भागवत यांनी सध्याच्या घडामोडींवर भाष्य केले.
माजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड, श्रीमती धनखड, इस्रायलचे कौन्सिलर जनरल प्रमुख यॉनिव्ह रेवाच या सोहळ्याचे अतिथी होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय गुप्ता, विदर्भ, महानगर संघचालक, संत-महंत, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सोहळ्याचा प्रारंभ स्वयंसेवकांच्या आकर्षक कवायतीने झाला. सोमवारी इतिहासात प्रथमच तरुणांचे ९ ठिकाणावरून पथसंचलन पार पडले.
डॉ. भागवत म्हणाले, बुद्धिभेद टाळण्यासाठ सर्वांना सतत सामूहिक प्रयत्न करावे लागतील संघाला प्रतिष्ठा, श्रेय नको. आम्ही निरंतर काम करीत राहणार आहोत. विश्वबंधुत्व, आध्यात्मिकता आणि मानवतावाद हेच हिंदुत्वाचे मूळ आहे. जगाला जोडण्याची क्षमता भारताकडे आहे. कॅप्टन स्मिथ मच्छर यांनी जगाला भारताचे वैशिष्ट्य दाखवून दिले. हा हिंदू स्वभाव आहे, अश शब्दांत डॉ. भागवत यांनी प्रशंसा केली.