Arun Wankar (Pudhari Photo)
नागपूर

Arun Wankar Passes Away | महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सचिव कॉम्रेड अरुण वनकर यांचे निधन

Nagpur News | इच्छेनुसार मेडिकल कॉलेजला देहदान

पुढारी वृत्तसेवा

Arun Wankar Passes Away

नागपूर: कामगार नेते, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सचिव कॉम्रेड अरुण वनकर यांचे नुकतेच निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे एक मुलगा व एक मुलगी, पत्नी वंदना वनकर असा परिवार आहे. त्यांच्या इच्छेनुसार मेडिकल कॉलेजला देहदान करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य किसान सभेचे ते राज्य सचिव होते. भारतीय कम्युनिस्ट पक्ष नागपूर जिल्हा कौन्सिलचे माजी सचिव, अखिल भारतीय नवजवान सभेचे राज्य कौन्सिलचे सचिव, संयुक्त किसान मोर्चाचे नागपूरचे निमंत्रक अशी विविध पदे त्यांनी भूषविली. आठ महिन्यांपूर्वी त्यांना अर्धांगवायुचा झटका आला होता. पक्वासा, मेडिकल व मेयो रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. अंतिम दिवसात ते पक्ष कार्यालयातच राहत होते हे विशेष.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT